Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव मनपात दीपमाला काळे महापौर, मनोज चौधरी उपमहापौर
    जळगाव

    जळगाव मनपात दीपमाला काळे महापौर, मनोज चौधरी उपमहापौर

    editor deskBy editor deskFebruary 2, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौर व उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महायुतीकडून आज या दोन्ही प्रतिष्ठेच्या पदांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. विरोधी गटाकडून कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने भाजपाच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौरपदी, तर शिंदेसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे.

    भाजपाचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. भाजपने ४६ पैकी ४६ जागांवर, तर शिवसेनेने २३ पैकी २२ जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे निवडणुकीनंतर महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.

    महापौरपद हे ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या पदासाठी उज्ज्वला बेंडाळे व दीपमाला काळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या वतीने दीपमाला काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ठरलेल्या सूत्रानुसार उपमहापौरपद शिवसेनेकडे गेले असून, प्रभाग क्रमांक ८ मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी यांना या पदाची संधी देण्यात आली आहे. विरोधकांकडून अर्ज न आल्याने त्यांचीही निवड निश्चित झाली आहे.

    या घोषणावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, चंद्रकांत सोनावणे, मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.