Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विमान अपघातातील कुटुंबांना आधार; रोहित पवारांनी व्यक्त केली सहानुभूती
    क्राईम

    विमान अपघातातील कुटुंबांना आधार; रोहित पवारांनी व्यक्त केली सहानुभूती

    editor deskBy editor deskFebruary 1, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    दुर्दैवी विमान अपघातात निधन झालेल्या एअर अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबाची रोहित पवार यांनी मुंबईत भेट घेऊन त्यांना धीर दिला व सहानुभूती व्यक्त केली. या अपघातात पिंकी माळी यांच्यासह जाधव, पाठक आणि कपूर कुटुंबांवरही दुःखाचा डोंगर कोसळला असून, ही सर्व कुटुंबे सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    पिंकी माळी यांचे वडील टॅक्सी चालक असून, मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःची खोली विकल्याची भावनिक माहिती यावेळी समोर आली. पिंकी मेहनती व जिद्दी स्वभावाची असून एअर अटेंडंट म्हणून काम करत होती. तिचा भाऊ पायलट व्हावा असे तिचे स्वप्न होते. मात्र आवश्यक शैक्षणिक पात्रता नसल्याने सध्या त्याला विमानतळावर ग्राउंड स्टाफची नोकरी मिळवून देण्यासाठी रोहित पवार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

    या संदर्भात काही अधिकाऱ्यांनी मदतीचे आश्वासन दिले असून पिंकीच्या भावाचा अर्ज संबंधित ठिकाणी पाठवण्यात आला आहे. नोकरी मिळेपर्यंत माळी कुटुंबाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन रोहित पवार यांनी दिले.

    यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणे टाळले. मात्र नुकत्याच महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनीता पवार यांच्याबाबत आनंद व्यक्त केला. तेरा दिवसांचा शासकीय दुखवटा संपल्यानंतर त्यांची भेट घेऊन अभिनंदन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुनीता पवार यांची सामाजिक क्षेत्रातील सक्रियता लक्षात घेता दादांनंतर आलेली ही मोठी जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.