Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
    क्राईम

    अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील वाकडी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    प्रियंका विठ्ठल बाविस्कर (वय-१५) रा. वाकडी ता.जि.जळगाव असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियंका बाविस्कर ही आपले वडील, तीन बहिणी आणि लहान भावासोबत वास्तव्याला आहे. तिचे वडील शेतात हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार १४ जुलै रोजी सकाळी तिचे वडील शेतात कामाला निघून गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रियंका घरात एकटी असतांना तिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. शेजारीच्या घरात प्रियंकाच्या आत्याचा हा प्रकार लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीला आली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत प्रियंकाच्या पश्चात वडील, तीन बहिणी आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.