लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: विमानासारख्या वाहनाचा अत्यंत किरकोळ बिघाड देखील प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतो, कारण विमान हे आकाशात अधांतरी उडणारे वाहन आहे. गेल्या महिन्यात तब्बल ९ वेळा स्पाईसजेट कंपनीचे विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
महिनाभरापूर्वी दिल्ली विमानतळावर जम्मूला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेले स्पाईसजेटचे विमान उड्डाणाच्या आधी विजेच्या खांबाला धडकले. त्यानंतर आता दुबईहून मदुराईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या बोईंग B737 MAX विमानाचे चाक निकामी झाल्याने उशीर झाला. स्पाईसजेटच्या विमानात वारंवार तांत्रिक बिघाडांच्या घटनांनंतर 19 जूनपासून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याआधी 2 जुलै रोजी जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान सुमारे 5,000 फूट उंचीवर क्रू मेंबर्सच्या केबिनमध्ये धूर पाहून दिल्लीला परतले होते.
त्यामुळे प्रवाशांनी तक्रार दाखल केली आहे. तर स्पाईसजेट कंपनीकडून स्पष्टीकरणही समोर आले आहे. बोईंग B737 MAX विमानाने सोमवारी मंगळुरु-दुबई फ्लाइट चालवली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, विमान उतरल्यानंतर एका अभियंत्याने तपासणी केली आणि समोरचे चाक नेहमीपेक्षा जास्त संकुचित झाल्याचे आढळले.