जळगाव : प्रतिनिधी
लहान मुलांच्या भांडणावरुन शेख खलील अहमद सलीम मणियार (वय ३७, रा. मणियार मोहल्ला वाडा, नशिराबाद, ता. जळगाव) यांना तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. २५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मणियार मोहल्ल्यात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील मणियार मोहल्ला परिसरात शेख खलील अहमद सलीम मणियार हे वास्तव्यास आहे. दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरुन शेख ओसामा शेख रहेमतुल्ला यांच्यासोबत वाद झाला. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. यावेळी शेख ओसामा यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी शेख खलील यांना शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यामारहाणीत शेख खलील यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्यांना गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शेख खलील यांनी नशिराबाद पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे हे करीत आहे.



