Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाळू वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी ३० हजारांची लाच; तलाठी अटकेत
    क्राईम

    वाळू वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी ३० हजारांची लाच; तलाठी अटकेत

    editor deskBy editor deskJanuary 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उघडकीस आणला आहे. नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने राबविलेल्या सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

    या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८/२०२६ दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६), तलाठी सजा उत्राण गुजर हद्द, ता. एरंडोल अशी आरोपींची नावे आहेत.

    तक्रारदाराचा ट्रॅक्टर २७ जानेवारी २०२६ रोजी गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला होता. पुढील कारवाई टाळण्यासाठी व ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी सुरुवातीला आरोपींनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र पडताळणीदरम्यान ही मागणी वाढवून ३० हजार करण्यात आली. “इतरांकडून जास्त घेतो, तू गरीब आहेस म्हणून तुझ्याकडून ३० हजार घेतो,” असे म्हणत लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

    तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत सापळा कारवाई राबविण्यात आली. या ठिकाणी आरोपी शिवाजी घोलप यांनी नरेश शिरूड यांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने दोघांना रंगेहात पकडले.

    सापळा कारवाईदरम्यान आरोपी नरेश शिरूड यांच्या ताब्यातून १ लाख ७३ हजार ३०० रुपये रोख, सुमारे २ हजार ९५० रुपये किमतीची Paul John कंपनीची ७५० मि.ली. व्हिस्की बाटली व ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

    यांनी केली कारवाई 

    या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस अंमलदार प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी व सचिन चाटे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत असून वरिष्ठ मार्गदर्शन पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने कणखर नेतृत्व गमावले – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

    January 28, 2026

    शेवटचे शब्द आणि भीषण स्फोट; अजित पवारांसोबत कोण होते ?

    January 28, 2026

    सीसीटीव्ही व डम्प डेटामुळे दुचाकी चोरटे गजाआड; अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी

    January 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.