मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचयतींच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचातींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला होता. यासाठी निवडणूक आयोगाने १८ ऑगस्टची तारीख देखील जाहीर केली होती. दरम्यान, याबाबत सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्यात आली होती. १२ जुलै रोजी सुनावणी झाल्यानंतर शासनाने समर्पित आयोगाने नागरीकांच्या मागासप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वाच्च न्यायालयात सादर करण्यात आला. याचे कामकाज आता १९ जुलै रोजी होणार असल्याने या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर ज्या क्षेत्रात आचारसंहिता जाहीर होती होती ती आपसुकच संपुष्टात आली आहे. याबाबतचे आदेश गुरुवार, १४ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी काढले आहेत.