Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान
    राजकारण

    पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान

    editor deskBy editor deskJanuary 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यंदा देशभरातील ४५ मान्यवरांना विविध पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे.

    राज्याच्या मातीतील लोककला जिवंत ठेवणारे लोकनाट्य तमाशा महर्षी रघुवीर खेडकर, वैद्यकीय क्षेत्रात निःस्वार्थ सेवा बजावणाऱ्या डॉ. अर्मिडा फर्नांडिस, कापूस संशोधनात क्रांती घडवणारे परभणीचे शेतकरी संशोधक श्रीरंग लाड तसेच पारंपरिक वाद्यसंस्कृती जपणारे तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

    देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये गणल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींचा समावेश आहे. कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, उद्योग, व्यवसाय, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा व नागरी सेवा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात.

    महाराष्ट्रातील या मान्यवरांच्या कार्यामुळे राज्याची ओळख राष्ट्रीय पातळीवर अधिक भक्कम झाली असून त्यांच्या या सन्मानामुळे समाजातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळणार आहे.

    पद्म पुरस्काराने सन्मानित नावे

    1. भगवंदास रायकर (मध्य प्रदेश)
    2. चरण हेम्ब्रम (ओडिशा)
    3. महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
    4. चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
    5. रघुपत सिंह (उत्तर प्रदेश)
    6. डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
    7. ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर)
    8. डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर)
    9. कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल)
    10. नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
    11. ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु)
    12. राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडु)
    13. थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडु)
    14. सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड)
    15. अंके गौड़ा (कर्नाटक)
    16. गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान)
    17. खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा)
    18. मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात)
    19. मोहन नगर (मध्य प्रदेश)
    20. नीलेश मंडलेवाला (गुजरात)
    21. आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़)
    22. राम रेड्डी ममिडी (तेलंगाना)
    23. सिमांचल पात्रो (ओडिशा)
    24. सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक)
    25. तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश)
    26. युनम जत्रा सिंह (मणिपुर)
    27. बुधरी ताथी (छत्तीसगढ़)
    28. डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना)
    29. डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडु)
    30. हैली वॉर (मेघालय)
    31. इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़)
    32. के. पाजनिवेल (पुडुचेरी)
    33. कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश)
    34. नुरुद्दीन अहमद (असम)
    35. पोकीला लेकटेपी (असम)
    36. आर. कृष्णन (तमिलनाडु)
    37. एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक)
    38. टागा राम भील (राजस्थान)
    39. विश्व बंधु (बिहार)
    40. धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात)
    41. शफी शौक़ (जम्मू-कश्मीर)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गावकुसाबाहेर डिजिटल पाऊल; पंचायतींसाठी ‘पंचम’ चॅटबॉट लाँच

    January 25, 2026

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026

    सलमान खानचा आर्मी लूक व्हायरल; ‘मातृभूमी’ गाण्याने पेटवली देशभक्तीची भावना

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.