Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात चोराकडून पोलीसाला मारहाण; बसस्थानकातील घटना
    क्राईम

    जळगावात चोराकडून पोलीसाला मारहाण; बसस्थानकातील घटना

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 13, 2022Updated:July 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरी करणार्‍या संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याला महिलेसह एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना जळगावातील बसस्थानकात घडली. याप्रकरणी दोन जणांवर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील डॉ. राहुल सांडू अग्रवाल (वय-२८) हे मंगळवारी १२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास बसस्थानकातून त्यांच्या पाकीट चोरल्याची घटना घडली. त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार गस्तीवर असलेले पोलीस नाईक जुबेर सिराज तडवी व अमित मराठे यांनी तात्काळ बसस्थानक गाठले. यावेळी एक अनोळखी इसम व महिला गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे पाकीट लांबवित असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार पोलीस कर्मचारी तडवी यांनी त्या इसमाची विचारपूस केली असता, त्याने तडवी यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात करीत त्यांना शिवीगाळ करु लागला. तडवी यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच त्याच्यासोबत असलेली महिला ही पोलीस कर्मचारी जुबेर तडवी यांच्या अंगावर धावून आली. या झटापटीत जुबेर तडवी यांचा शर्ट फाटला.

    पोलिस कर्मचारी तडवी यांनी घटनेची माहिती तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना दिली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली. मारहाण करणाऱ्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गणेश चंद्रकांत आठवले (वय-३२, रा. शिवाजी नगर, जळगाव) व सरला पितांबर ठाकूर (वय-२१, रा. विजयनगर, नाशिक) अशी दोघांची नावे चौकशीत समोर आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.