तापी नदी पत्रात न जाण्याचा जिल्हा प्रशासनाचे आवाहन
भुसावळ प्रतिनिधी । तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाणी वेगाने वाहू लागल्याने बुधवारी सायंकाळी हतनूर धरणाचे सर्व ४१ पैकी २८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून ३० हजार ४४५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी १३ जुलै रेाजी दिवसभर दमदार पाऊस झाल्याने सायंकाळी हतनूर धरणाचे ४१ पैकी २८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यात हतनूर धरण क्षेत्रात बुधवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला. यामुळे धरण फुल्ल भरले असल्याने धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून ३० हजार ४४५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तापी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.