नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने संपूर्णतः रस्ते पाण्याखाली गेले. येथील नागरिकांसमोर दळण वळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.
राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.शाळकरी विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाना सदरच्या पुराच्या पाण्यामुळे आपआपल्या घरी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. नाशिकध्ये सप्तश्रृंगी गडावर ढगफुटी झाली. यावेळी धावपळीत अनेकदा नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. नाशिकमध्ये पुढील 4 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकमधील एकूण सहा धरणांमधून 50 हजार क्युसेक्सनं जायकवाडीकडे विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरात संपूर्ण रामकुंड परिसर पाण्याखाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात यंत्रणा सतर्क झाल्या असून 7 छोटे पूल पाण्याखाली तर 12 गावांचा संपर्क तुटला आहे. नागपुरातून सतरापूर आणि नांदा गावांमधून वाहणाऱ्या नाल्याला पूर आलाय. पाण्याचा मोठा लोंढा आला आणि स्कॉर्पिओ वाहून गेली. एका खडकाला गाडी अडकून राहिली मात्र त्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले नाही. गाडी चालकाने डोके लढवीत पूरातून मार्ग काढण्यासाठी गेले असता हा जीव घेण प्रकार घडला आहे.