परिसरात शोककळा; आज सायंकाळी अंत्ययात्रा
धरणगाव | प्रतिनिधी
तर्डे येथील रहिवासी श्री. हिलाल हरचंद पाटील यांचे मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 3 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तर्डे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
स्व. हिलाल हरचंद पाटील हे शांत, मनमिळावू व सामाजिक स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पुत्र श्री. नंदलाल हिलाल पाटील व श्री. दीपक हिलाल पाटील तसेच आप्तेष्ट, नातेवाईक असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 3 वाजता, राहत्या घरापासून निघणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर मोठा आघात झाला असून, परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.



