अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मुंगसे ते सावखेडा रस्त्यावर वाळूचा उपसा करण्यासाठी लागणारे मजुर घेऊन जाणारे ट्रॅक्टर सोमवारी सकाळी उलटून झालेल्या अपघातात १५ मजूर जखमी झाले आहेत. जखमींवर धुळे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंगसे ते सावखेडा रस्त्यावर वाळूचा उपसा करण्यासाठी लागणारे मजुर घेऊन जाणारे ट्रॅक्टर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता उलले. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता घडली. तर अपघात घडल्यानंतर तत्काळ १०८ अॅम्बुलन्सला कॉल करण्यात आली. परंतु, ही अॅम्बुलन्स तब्ब्ल ४ तास उशिरा आल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर जखमी मजुरांना खासगी वाहनांनी दवाखान्यात नेण्यात आले.
या अपघातात ज्ञानेश्वर भाईदास भील, राहुल तुकाराम भील, अजय बन्सी भील, लखन सुभाष भील, सुनील संभाजी भील, सुरेश रामदास भील, सागर शांताराम भील, विशाल विनोद भील, विशाल सुभाष भील, गोविंदा सखाराम भील, कृष्णा सुखदेव भील, जितेंद्र भाईदास भील, समाधान सुखदेव भील, सागर मंगल वाघ, विपुल बोरसे हे मजूर जखमी झाले आहेत. दरम्यान, मुंगसे येथील तापी नदी पात्रातील वाळूचा लिलाव झाल्याने मुंगसे ते सावखेडा रस्त्यावर वाळूच्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे सुसाट वेगाने जाणाऱ्या या वाहनांपासून पायी चालणाऱ्या विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने पालकांनी ही वाहने नदीतून थेट सावखेडा पुलाकडे वळण्याची मागणी केली आहे.



