वावडदा, वाकडी परिसरातील चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावण्याचा नागरीकांची मागणी
प्रविण पाटील प्रतिनिधी । वावडदा-म्हसावद रोडवरील प्लॉस्ट कंपनीतून १२ हजार रुपये किंमतीचे भंगार चोरुन नेणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तिघांना गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, वावडदा, वाकडी या परिसरातील गुन्ह्याचा शोध देखील लावावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वावडदा-म्हसावद रोडवरील श्री गुरुप्रभा पावर प्लॉट कंपनी आहे. या कंपनी आवारात भंगार सामान तोडताड करुन ठेवलेला होता. सोमवारी ११ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदरचा १२ हजार रुपये किंमतीचा सामान चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. प्रकार समोर आल्यानंतर कंपनीचे सुपरवायझर विजय श्रीरामधनी यादव (वय ३८) यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी वावडदा येथील असल्याची गापेनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, होमगार्ड नितीन चिंचोले, मयूर सोनवणे यांनी वावडदा येथून संशयित आरोपी जगदीश कैलास गोपाळ (वय-२२), सुभाष रोहिदास गोपाळे (वय-३०) आणि दिपक गोपीचंद गोपाळ (वय-२२) तिघे रा. वावडदा ता.जि.जळगाव यांना सोमवारी ११ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता अटक केली. तिघांना न्यायालयात हजर केले असता गुरूवार १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, वावडदा, वाकडी येथील काही आरोपी पोलीसांच्या हाती लागू शकतात अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्यादिशेने पोलीसांचा तपास सुरू आहे. लवकरच यात सहभागी आरोपी निष्पन्न होऊन सत्य समोर येइल. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळके, विटनेर, वराड व वसंतवाडी या गावातील बरेच चोरीचे गुन्हे व तक्रारी दाखल आहे. त्यांच्या तपासायचे काय? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनकडुन उपस्थित केला जात आहे. परंतु गुरुप्रभा पावर प्लंन्ट कंपनीतील भंगार चोरीतील आरोपींचा त्वरित शोध घेतल्यामुळे म्हसावद पोलिस दुरक्षेत्राच्या सर्वच कर्मचारी व होमगार्ड यांचं कौतुक केले जात आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या असून आपल्याची चोरी झालेल्या गुन्ह्यातील आरीपींचा शोध लागेल अशी भावाना व्यक्त केली जात आहे.