Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळ तालुक्यात भेसळखोरीचा भंडाफोड; गुजरात कनेक्शन उघड
    राजकारण

    भुसावळ तालुक्यात भेसळखोरीचा भंडाफोड; गुजरात कनेक्शन उघड

    editor deskBy editor deskJanuary 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भुसावळ तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा व संशयास्पद इंधन साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ तालुका पोलीस आणि पुरवठा विभागाला मोठे यश आले आहे. ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीच्या गोदामावर टाकलेल्या संयुक्त धाडीत तब्बल ३० हजार लिटर डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थाने भरलेला टँकर जप्त करण्यात आला असून, सुमारे ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील ऑईल माफिया आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

    भुसावळ तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक एफ-५०/५१ येथील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार तहसीलदारांच्या आदेशाने पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे आणि त्यांच्या पथकाने रविवारी (दि. १८) दुपारी साडेअकराच्या सुमारास पंचासमक्ष धाड टाकली.

    कारवाईदरम्यान जी.जे. २४ – व्ही. ७६५५ क्रमांकाचा टँकर कंपनीच्या आवारात उभा असल्याचे आढळून आले. टँकरमधून काढलेल्या द्रव पदार्थास डिझेलसारखा उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी उपस्थित असलेल्या कंपनी मालकाचा भाऊ अमीन इक्बाल तेली (रा. सुरत) यांची चौकशी केली असता समाधानकारक माहिती मिळाली नाही. टँकर भाडेकरारावर आणल्याचा दावा करण्यात आला; मात्र चालक घटनास्थळी अनुपस्थित होता.

    अधिकाऱ्यांनी टँकरमधील इंधनाची घनता (७१२) आणि तापमान (२०) तपासले. हा पदार्थ बायोडिझेल की भेसळयुक्त डिझेल, याची खातरजमा करण्यासाठी नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत (सी.ए.) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

    या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा टँकर आणि २१ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर इंधन (प्रति लिटर ७० रुपये दराने) असा एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त टँकर पुढील सुरक्षिततेसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हलवण्यात आला आहे.

    ही कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे, उपनिरीक्षक रवी नरवडे, हवालदार उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाणे, रतन परदेशी, विकास सातदिवे, राहुल वानखेडे तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पंच म्हणून तलाठी मनीषा बरडिया आणि प्रमोद ठोसर उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जम्मू-काश्मीरमध्ये शोकांतिका; लष्कराची बुलेटप्रूफ गाडी 200 फूट दरीत !

    January 22, 2026

    आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगांवात उद्योग व रोजगारनिर्मितीचा मास्टरस्ट्रोक,

    January 22, 2026

    अचलपूरमध्ये भाजप–एमआयएम युतीच्या चर्चांचे खंडन !

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.