Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशिराबादमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; १६ जण जखमी, जीएमसीत उपचार !
    क्राईम

    नशिराबादमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; १६ जण जखमी, जीएमसीत उपचार !

    editor deskBy editor deskJanuary 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील नशिराबाद येथे रविवारी (दि.१८) दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एकूण १६ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये अल्पवयीन मुले व महिलांचाही समावेश आहे. या घटनेदरम्यान दगडफेक करण्यात आल्याने काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या असल्याची माहिती जखमींनी रुग्णालयात दिली.

    सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद येथील इस्लामपुरा भागात राहणारे आरीफ अली यांच्या घरी रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून दुसऱ्या गटाने अचानक दगडफेक करत लोखंडी पाइप, लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात शेख अमीन शेख बाबू (४५), अब्दुल महेमूद अब्दुल गनी (५६), मोईल अब्दल ररुफ (२२), आकीब नवाब अब्दुल महेमूद (२८), रिजवान रऊफ खान (२८), आवेश जहांगीर शेख (२४), अबुजर जहाँगीर शेख (२०), सैयद नावीद सैयद आरिफ (२२), सैयद आसिफ सैयद रशीद (४२), हसनैन सैयद आरीफ (१४), मुश्ताक शेख नवीद (१६), गुलाम मोहम्मद अली (२१), दानिश सैयद रफिक (२३), आरीफ अली रशीद अली (४७), रजिया जुल्फिकार अली (४७) व शेख मुस्तकीम शेख अन्वर (३०) हे जखमी झाले.

    हाणामारीनंतर जखमी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता तेथे पुन्हा वाद झाला. यावेळी २०० ते २५० जणांचा जमाव जमा झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू असतानाही जखमी गटांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला असून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांत कोणतीही अधिकृत नोंद झालेली नव्हती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.