लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जळगाव | प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील भोलाणे गावातील बस स्थानकाजवळ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाळू सदाशिव कोळी (वय 38) यांचा निर्मम खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या खुनामागे त्यांच्याच जवळच्या मित्राचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेत असलेल्या बाळू सदाशिव कोळी यांना जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणात आकाश नामक यांच्यावर संशय व्यक्त केला जात असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून आरोपीची चौकशी व पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे भोलाणे गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



