धरणगाव नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी विनय उर्फ पप्पू भावे यांची निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच धरणगाव शहराची नगरपालिका निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत पप्पू भावे यांच्या सौभाग्यवती वैशाली विनय भावे या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या उमेदवार होत्या. मात्र, त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्यानंतरही नेतृत्व आणि कार्याचा योग्य सन्मान राखत, राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विनय उर्फ पप्पू भावे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली. या निर्णयामुळे भावे यांना योग्य तो न्याय मिळाल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे.
“गड आला पण सिंह गेला” असे म्हणत असतानाच, आता पप्पू भावे यांची पुन्हा एकदा नगरपालिकेत धडाकेबाज एन्ट्री झाली आहे. शहराच्या राजकारणात आणि विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका पुन्हा एकदा महत्त्वाची ठरणार आहे.
धरणगाव शहराच्या विकासाचा स्पष्ट रोड मॅप असलेले नेतृत्व म्हणून पप्पू भावे यांची ओळख आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा फायदा आता थेट शहरवासीयांना होणार असून, येत्या काळात धरणगाव शहराच्या विकासाला शंभर टक्के गती मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.



