मुंबई वृत्तसेवा । भाजपा हा आपला नैसर्गिक मित्र पक्ष आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. अशी माहिती शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांनी दिली.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदारांच्या विनंती वरून शेवटी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर खा. गोडसे यांची प्रतिक्रीया घेतली त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊतांनी शिंदेंना टॅग केल्यामुळे खळबळ माजली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपाला मदतीचा हात करावी, अशी आम्ही मागणी होती. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे, असं आम्ही सांगितलं. यावर विचार करू असं उद्धवजी म्हणाले होते.
शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. शिवसेनेच्या खासदारांनी नैसर्गिक युती करावी अशी मागणी केली.