Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘२४ तास जनतेसाठी’ असलेले नेतृत्व : जळगावच्या राजकारणात ‘राजू मामा’ ठरताहेत भरोशाचा चेहरा
    जळगाव

    ‘२४ तास जनतेसाठी’ असलेले नेतृत्व : जळगावच्या राजकारणात ‘राजू मामा’ ठरताहेत भरोशाचा चेहरा

    editor deskBy editor deskJanuary 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहराच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले; मात्र गेल्या काही वर्षांपासून जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे आमदार सुरेश दामू भोळे—संपूर्ण जळगावकरांचे लाडके ‘राजू मामा’. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर वर्षभर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

    राजू मामांच्या लोकप्रियतेमागील मुख्य कारण म्हणजे त्यांचा साधा, ‘डाउन टू अर्थ’ स्वभाव. लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम असोत किंवा शोकसभा—प्रोटोकॉलच्या चौकटी मोडून ते थेट सामान्य नागरिकांमध्ये मिसळतात. हीच आपुलकी आणि सहजता त्यांच्या जनसंपर्काची खरी ताकद ठरत आहे.

    त्यांचा जनसंपर्क कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित नाही. लहान मुलांशी संवाद साधण्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यापर्यंत ‘वन-टू-वन टच’ राखणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. हा थेट संवाद आजच्या राजकारणात दुर्मीळ ठरत असून इतर नेत्यांसाठी अभ्यासाचा विषय बनला आहे.

    आज अनेक मोठ्या नेत्यांचे फोन स्वीय सहाय्यक उचलत असताना, आमदार सुरेश भोळे यांचा मोबाईल २४ तास सुरू असणे हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. कोणताही सामान्य नागरिक थेट संपर्क साधू शकतो आणि तितक्याच तत्परतेने प्रतिसाद मिळतो, ही भावना जळगावकरांमध्ये दृढ झाली आहे.

    अलीकडील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला जळगाव शहरातून मिळालेल्या मोठ्या मताधिक्याचे श्रेय राजकीय विश्लेषक थेट राजू मामांच्या मजबूत जनसंपर्काला देतात. निवडणुकीपुरता नव्हे तर वर्षभर जनतेच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची भूमिका मतदारांच्या विश्वासात रूपांतरित झाली आहे.

    आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असले, तरी सुरेश भोळे यांच्या प्रभावी संघटन कौशल्यामुळे भाजपासाठी ही लढत तुलनेने सोपी मानली जात आहे. कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि वैयक्तिक गाठीभेटींच्या जोरावर भाजपाला आगामी निवडणुकीत मोठा फायदा होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

    राजकारण हे केवळ सत्तेचे नव्हे तर समाजसेवेचे माध्यम आहे, हे आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. विकासकामांसोबतच माणसं जोडण्याची कला आत्मसात केलेला हा नेता भविष्यातही जळगावच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल, यात शंका नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे

    March 4, 2026

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026

    भाचीच्या लग्नातील दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला; तिघांना अटक

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.