जळगाव : प्रतिनिधी
हट्टा येथील एस व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य प्रा. डॉ. उमेश जाधव यांना नुकतीच इंदोर येथील ओरिएंटल विद्यापीठातर्फे पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांनी औषधनिर्माण शाखेतून ‘डेव्हलपमेंट अँड इव्हाल्युएशन ऑफ हर्बल इथोझोम्स ऑफ पॅसिफ्लोरा फोइटिडा लिन फॉर ट्रीटमेंट ऑफ सोरायसिस’ या विषयावर आपले शोधप्रबंध सादर केले. त्यांना जळगाव येथील प्रा. डॉ. हर्षल तारे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी पदवी प्रदान झाल्याने त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
आपल्या संशोधन कार्यकाळात त्यांनी २ पुस्तके, १०५ शोधनिबंध आणि २ पेटंट्स प्रकाशित केले. संशोधन क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले. पीएच.डी कार्यकाळात केलेल्या सखोल संशोधनाबद्दल ओरिएंटल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. अमोल गोरे, प्र कुलगुरु प्रा. डॉ. ध्रुव घई, कुलसचिव प्रा. डॉ. अजयेंद्र नाथ, रिसर्च डीन प्रा. डॉ. धीरज नीम, असोसिएट डीन प्रा. डॉ. क्रतिका डॅनिअल, फार्मसी प्रमुख प्रा. डॉ. सुधा वेंगुर्लेकर, प्रा. डॉ. सचिन कुमार जैन, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाचे चे अध्यक्ष माननीय डॉ. वेदप्रकाश पाटील (माजी कुलगुरू), संस्थेचे सचिव माननीय आमदार डॉ. राहुल पाटील आणि संस्थेचे डायरेक्टर श्री श्याम परिहार यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रातील पुढील संशोधनास शुभेच्छा दिल्या.



