पत्रकार आणि पोलिस बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव रोटरी क्लब च्या वतीने आज दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार आणि पोलिस बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन धरणगांव पोलिस स्थानक येथे करण्यात आले.
या विशेष उपक्रमात ब्लड प्रेशर, व शुगरची तपासणी, थायरॉईड तपासणी, ईसीजी व हृदयरोग तपासणी, दंत तपासणी इत्यादी आरोग्य तपासण्या करण्यात आल्यात. शिबिरात डॉ. धीरल महाजन (MD Medicine): संचालक, फोर्टिस हॉस्पिटल, जळगाव, डॉ. अतुल शिंदे: संचालक, शिंदे क्लिनिक, धरणगाव, डॉ. मनोज अमृतकर: संचालक, सिद्धी क्लिनिक, धरणगाव, डॉ. सचिन पेंढारे: वेदांत दंत क्लिनिक, धरणगाव, डॉ. अभिजीत पाटील: श्री दंत क्लिनिक, धरणगाव या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले.
शिबिरास रोटरी क्लब धरणगांवचे अध्यक्ष प्राध्यापक ए आर पाटील सर, डी डी पाटील सर, किशोर येवले, नितीन पाटील सर, भागवत मराठे, दिनेश माळी, रवींद्र हरपे, डॉक्टर कांचन महाजन, राकेश सोनार , गजानन साठे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.



