जळगाव ;- दरवर्षी श्रावण पौर्णिमेला विश्व संस्कृत दिवस साजरा करण्यात येतो. पोदार इंटरनॅशनलस्कुल जळगाव, येथे विश्व संस्कृत दिवस व रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगाचे औचीत्य साधून पोदार इंटरनॅशनलस्कुलचे प्राचार्य श्री.गोकुळ महाजन यांनी श्री सरस्वती पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या संस्कृत विभाग प्रमुख सौ.किर्ती पाटील यांनी केले.यावेळी उपस्थित शिक्षकांनी सामाजिक अंतर राखून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरवात इ.९ वी ची विद्यार्थिनी कु.अदिती वाघ हिने संस्कृत मधील प्रार्थनेने केली.ओवी महाजन इ.८ वी च्या विद्यार्थिनीने संस्कृत भाषणातून या प्राचीन भाषेची महत्ता वर्णन केली.४००० वर्षांचा इतिहास असलेल्या संस्कृत भाषेला देवभाषा म्हणूनही ओळखले जाते तसेच वेद व पुराण देखील संस्कृत मधूनच लिहिले गेले म्हणून संस्कृत हि विद्वानांची भाषा असून संपूर्ण जगात तिला खूप मान आहे असे मत विषद केले.
या प्रसंगी इ.९ वी तील याद्निका बाजपेयी हिने संस्कृत श्लोकांचे पठण केले. या दरम्यान शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत इ.६ वी गटातून विजयी पार्थ जोशी,रुद्र पाटील,पवित्रा बारी ,शर्मिष्ठा पाटील,हर्ष खैरनार व अथर्व खडसेतर इ.९ वी गटातून कणव भुतडा व पुर्विका धांडे या विद्यार्थ्यांना व्हिडीओ सादरीकरणाच्या माध्यमातून उत्कृष्टता प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
भारतातील नावाजलेले पुस्तक निर्माते रचना सागर आणी कंपनी यांच्यातर्फे संस्कृत दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध लेखन स्पर्धेत शाळेतील समृद्धी सुपेकर व अभंग पुंडलिक तर गायन स्पर्धेतील विजेते- दिव्यांषु कुलकर्णी,लाभेश बाहेती दर्शउपाध्याय,चिन्मयी बोरोले व किरण नारखेडे होते. तसेच चित्रकला स्पर्धेत अनया पवार भावेश वाडे,रितेश राणे,अभिराज पवार व मृणालीबागुल या पोदार स्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्रमाणपत्रे पटकावली.
शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या प्राथमिक विभागातील कु. योगिनी गाढवे यांनी रक्षाबंधन ह्या सणाविषयी माहिती व महत्व सांगितले.याप्रसंगी इ.९ वीतील अवंती पाटील ह्या विद्यार्थिनीने आपल्या इंग्रजी भाषणातून रक्षाबंधन सारख्या सणातून कुटुंब व समाज परंपरेने संस्कृतीचे संरक्षण वसंवर्धन होते असे मत मांडले.शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी उपस्थितांना विश्व संस्कृत दिन ,ओणम व रक्षाबंधन या सणांच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी घरूनच मोठ्या प्रमाणात सचित्र प्रक्षेपणाच्या माध्यमातून उपस्थिती दर्शविली.युटयुबद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
शाळेचे उपप्राचार्य दिपक भावसार ,पोदार जम्बो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ,प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे वरिष्ठ समन्वयक हिरालाल गोराणे ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतरकर्मचारी यावेळी उपस्थित होते. आभार प्रदर्शन सौ.निहारिका ईश्वर यांनी केले.