Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रभाग १६ मध्ये ‘ट्रक’ सुसाट :  अपक्ष उमेदवार इच्छा दीपक अत्तरदे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    जळगाव

    प्रभाग १६ मध्ये ‘ट्रक’ सुसाट :  अपक्ष उमेदवार इच्छा दीपक अत्तरदे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    editor deskBy editor deskJanuary 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रभाग क्रमांक १६ मधील नागरी समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार करत, अपक्ष उमेदवार इच्छा दीपक अत्तरदे यांनी प्रभाग १६ (क) मधून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. ‘ट्रक’ हे निवडणूक चिन्ह घेऊन रिंगणात उतरलेल्या इच्छा अत्तरदे यांच्या प्रचाराचा प्रारंभ अत्यंत जलोषात झाला असून, ठिकठिकाणी त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

    ​महिलांकडून औक्षण, फुलांची उधळण
    ​प्रचारादरम्यान प्रभागातील गल्लोगल्ली इच्छा अत्तरदे यांचे जंगी स्वागत केले जात आहे. विशेषतः महिला वर्गामध्ये त्यांच्याबद्दल मोठा उत्साह दिसून येत असून, ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून आणि फुलांची उधळण करून स्वागत केले जात आहे. त्यांना मिळणारा हा वाढता जनसामान्यांचा प्रतिसाद पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

    ​”विकासाचे चित्र बदलणार” – इच्छा अत्तरदे
    ​यावेळी मतदारांशी संवाद साधताना इच्छा अत्तरदे म्हणाल्या की, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रभागात सातत्याने सेवाभावी कार्य करत आहोत. सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक पातळीवर आम्ही नेहमीच नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी झालो आहोत आणि भविष्यातही ही साथ कायम राहील. केवळ आश्वासने न देता, प्रत्यक्ष कृतीतून प्रभागाचा कायापालट करणे हाच आमचा उद्देश आहे.”

    ​प्रगतीचा ‘रोडमॅप’: विकासाची पंचसूत्री
    ​इच्छा अत्तरदे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपला जाहीरनामा मतदारांपुढे मांडला आहे: ​खड्डेमुक्त प्रभाग: प्रभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यावर भर.

    ​प्रकाशमय प्रभाग: प्रत्येक गल्लीत अत्याधुनिक (LED) पथदिवे बसवून अडथळेविरहित प्रकाश व्यवस्था निर्माण करणे. ​स्वच्छता व आरोग्य: पाणी आणि सांडपाणी गटारींची नियमित स्वच्छता व दैनंदिन साफसफाईचे नियोजन.

    ​पायाभूत सुविधा: नागरिकांसाठी मूलभूत सोयी-सुविधांची उपलब्धता करून देणे.

    ​’विजयी करण्याचे आवाहन’
    ​”नवीन वर्षात प्रभाग १६ च्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला आपले अनमोल मत आणि आशीर्वाद देऊन विजयी करावे, जेणेकरून आम्हाला आपल्या सेवेची अधिक संधी मिळेल,” असे आवाहन अत्तरदे यांनी यावेळी केले. ‘चित्र बदलवेल आपल्या प्रभागाचं’ ही घोषणा आता प्रभागातील घराघरांत पोहोचली असून, ‘ट्रक’ चिन्हाला मिळणारा प्रतिसाद विजयाची ग्वाही देत असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026

    मिनी ट्रकला भीषण आग; तीन स्फोट, चालकाची प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.