Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रभाग ७ ‘ड’ मध्ये भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात; चंद्रशेखर अत्तरदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली !
    जळगाव

    प्रभाग ७ ‘ड’ मध्ये भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात; चंद्रशेखर अत्तरदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली !

    editor deskBy editor deskJanuary 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धडाकेबाज सुरुवात झाली असून प्रभाग ७ ‘ड’ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारासाठी आज सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. गणेश कॉलनीसह परिसरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    निवडणुकीचे वारे वाहू लागताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून प्रचारादरम्यान उमेदवारांनी विविध भागांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांवर भर देत भाजपच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

    या रॅलीत प्रभाग ७ मधील भाजपचे उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे, चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह चेतन तिवारी, मयूर भोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान तरुणांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. ठिकठिकाणी महिलांनी उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे औक्षण करत त्यांचे स्वागत केले. प्रभागाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी भाजपलाच कौल द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुंभमेळ्यावरून मंत्री नीतेश राणेंचे वादग्रस्त विधान; ‘हिंदूंव्यतिरिक्त स्टॉल नको’

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026

    वरसाडे तांड्यातील बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा; प्रेमसंबंधातून पती-पत्नीने रचला कट

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.