लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ठाकरे यांच्यात संघर्ष सुरूच आहे. नव्याने शिवसेनेला उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.अनेक ठिकाणी शिवसेनेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आता दहिसर येथील फेरीत आक्रमक भूमिका घेतली आहे.
यावेळी त्यांनी बंडखोर आमदाराना लाज असेल, हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असं वक्तव्य केलं होतं. शिदें यांनी 40 आमदारांना सोबत घेत बंड केल्याने महाविकास आघाडी सरकारकडून विकास कामासाठी अपुरा निधी आणि हिदुत्वांच्या विचारांचं आरोप आमदारांनी केला. एकनाथ शिंदेंनी मागण्या ठाकरेंसमोर ठेवल्या त्या शिवसेनेनं मान्य न केल्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय केला.
आदित्य ठाकरेंच्या टीकेला 2019 साली जनतेने भाजप-शिवसेना युतीला मत देत कौल दिला होता. मात्र तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली तेव्हा विचार केला का? आम्ही काहीच चुकीच केलं नाही. त्यामुळे लाज वाटण्याचा काहीच संबध नाही. आम्ही शिवसेना आता सोडणार नाही, असं वक्तव्य करत भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युतर दिलं. शिवसेना आता कमजोर झाली आहे. शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे याचे प्रयत्न सुरू आहेत.