Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ७ मध्ये चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    जळगाव

    जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ७ मध्ये चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 4, 2026Updated:January 4, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महापालिका रणसंग्राम…

    जळगाव –  शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक ७ मध्ये उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ रविवारी सकाळी करण्यात आला. गणेश कॉलनीतील गुरुदेव दत्त मंदिर परिसरात सकाळी १० वाजता नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ झाला. या वेळी आमदार राजूमामा भोळे तसेच दिनकर गुरुजी उपस्थित होते. 

    दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक ७ मध्ये अ मधून दीपमाला मनोज काळे, ब मधून अंकिता पंकज पाटील आणि क मधून विशाल सुरेश भोळे हे बिनविरोध निवडून निश्चित झाले आहेत. मात्र प्रभाग ड मध्ये अत्तरदे हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे. 

    आमदार राजूमामा भोळे यांनी या प्रसंगी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, शहराच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे. शुभारंभानंतर अत्तरदे यांनी श्रीकृष्ण कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, संत ज्ञानेश्वर कॉलनी आणि गणेश कॉलनी परिसरात प्रचारफेरी काढली. नागरिकांनी या फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. 

    या कार्यक्रमाला उमेदवार दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील, विशाल सुरेश भोळे यांच्यासह माजी महापौर सीमाताई भोळे, माजी नगरसेवक जयश्री नितीन पाटील, मनोज काळे, माधुरी अत्तरदे, पंकज पाटील, सरचिटणीस चेतन तिवारी, सविता बोरसे, ऋषिकेश शिंपी, बंटी नेरपगार आदी मान्यवर उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.