महापालिका रणसंग्राम
जळगाव – महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग २ (अ) मधून शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार शिवसेना सागर शामकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या समोर उभे राहिलेले अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने विक्रांत सोनवणे यांचा विजय निर्विवाद ठरला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.
या विजयामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांची रणनीती महत्त्वाची ठरली आहे. दोघांनी मिळून केलेल्या राजकीय खेळीमुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, बिनविरोध निवडणुकीमुळे शिवसेनेच्या संघटनशक्तीला बळकटी मिळाली आहे.



