मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. तर, अनेक भागांतील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील या दमदार पावसामुळे जिल्हातील धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. गंगापूर धरणातून सोडलेल्या विसर्ग गोदावरील पूर आला आहे. नाशिक रेड अलर्ट जारी केल्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तीन चार दिवस नाशिकमध्ये शाळा आज बंद राहणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात अजून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पूरस्थिती उद्बवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, नदीकाठावर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. महालपाटणे (ता. देवळा) गावाला पुराचा धोका वाढला असून पेठ तालुक्यात एक जण नाल्याच्या पुराच्या पाण्यात बुडाला आहे. त्याचा दुपारपासून शोध सुरु आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस कायम असून, आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यास रेड अलर्ट जारी करून पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शाळा आज बंद राहणार आहेत. तर, या पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या पाच दिवसांपासून निफाड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे, त्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय, शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांचे सर्वांत मोठे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसामुळे नाशिकच्या सप्तशृंग गडावर ढगफुटी झाली असून पाण्याच्या प्रवाहाने दगड, माती वाहून आल्यानं मंदिरातून खाली उतरणारे 6 भाविक जखमी झाले.