लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार असल्याचं निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षणा करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व प्रयत्न केले आहेत. यापुढेही करत राहू, ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.