Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मतदानासाठी भरपगारी सुट्टी अनिवार्य; मतदान दिनी सुट्टी न दिल्यास तक्रारीवर तात्काळ होणार कारवाई
    Uncategorized

    मतदानासाठी भरपगारी सुट्टी अनिवार्य; मतदान दिनी सुट्टी न दिल्यास तक्रारीवर तात्काळ होणार कारवाई

    editor deskBy editor deskJanuary 1, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भारताने लोकशाही पद्धती स्वीकारल्यानंतर १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. लोकशाही पद्धतीचे संरक्षण आणि प्रत्येक मतदारास मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १3५ (बी) नुसार निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदारांना भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य असून, जळगाव जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्देश जारी केले आहेत.

    राज्य निवडणूक आयोगामार्फत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांना मतदानाचा हक्क योग्यरीत्या बजावता यावा, यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी व कामगार, जरी ते कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी, त्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे.

    हा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या, हॉटेल्स, खाद्यगृहे, मॉल्स, रिटेल आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, रुग्णालये व दवाखाने यांना लागू राहणार आहेत. अत्यावश्यक व लोकोपयोगी सेवांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे संबंधित नियोक्त्यांना बंधनकारक राहील असे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजीचे शासन परिपत्रक यासंदर्भात लागू असून, सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव डॉ. रा. दे. गुन्हाने यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.