लशिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड पुकारले नवीन सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. बैठकीला तब्बल १० खासदार गैरहजर होते. त्यामुळे शिवसेनेचे काही खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उदान आले आहे.
शिवसेनेत आमदारांनी बंडामुळे खासदार देखील शिंदे गटात सामील होणार आहे. शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदारांनीही पक्षातील खासदार आमच्या संपर्कात असल्याचे माहिती होती. तसेच भाजपने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेल्या द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती. हा प्रकार लक्षात येताच उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला तब्बल १० खासदार गैरहजर असल्याचे समोर आले आहे.
या बैठकीला एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. तर ईडीच्या कारवाईने त्रस्त असलेल्या खासदार भावना गवळी सुद्धा या बैठकीला गैरहजर आहे. शिवसेनेच्या मातोश्री वरील बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये भावना गवळी – यवतमाळ वाशिम, हेमंत जाधव – परभणी, संजय महाडिक – कोल्हापूर, हेमंत पाटील – हिंगोली, श्रीकांत शिंदे – कल्याण-डोंबिवली, कृपाल तुमाने – रामटेक, कलाबेन डेलकर – दादरा-नगर-हवेली अशी नावे समोर आली आहेत. त्यामुळे हा आता शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख व प्रमुख नेते पक्ष बांधणीची कामे करत आहेत. तर दुसरीकडे पक्षातील कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत.