विजय पाटील :जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक रंगत आली असताना जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मागील साईडला गोलाणी मार्केट परिसरात एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गोलानी मार्केट परिसरात एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे तर संबंधित जखमी तरुणाला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.



