लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे गटा विरुध्द शिवसेना वाद टोकाला गेला आहे. तर ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दुसरीकडे निवडणूक चिन्हाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले.
अनिल परबाचे मोठे वक्तव्य, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाकडेही जाणार नाही, याबाबतची लढाई आता निवडणूक आयोगाकडे होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिलेल्या निर्देशानंतर अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. विधीमंडळ सचिवालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आले, त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय ते घेतील.
आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, सध्याचे विधानसभा अध्यक्ष भाजपकडे आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची धुसर आहे. त्यामुळे . त्यानुसार, आमच्या सुप्रीम कोर्टात निर्णय येईपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घेऊ नये अशी मागणी केली होती.शिवसेनेच्या सर्व याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर अपात्रतेवर कारवाई होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या बंडखोर आमदारांना दिलासा दिला. तसेच पुढील सुनावणी कधी होणार याविषयीची तारीख न्यायालयाने दिली नाही.