Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सांगोल्यात भाषण रंगले; शहाजीबापू पाटलांचे विरोधकांवर हल्लाबोल
    राजकारण

    सांगोल्यात भाषण रंगले; शहाजीबापू पाटलांचे विरोधकांवर हल्लाबोल

    editor deskBy editor deskDecember 30, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सांगोला : वृत्तसंस्था

    शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात झालेल्या सभेत वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शिवसेनेला मतदान करणारे थेट स्वर्गात जाणार असल्याचे विधान त्यांनी यावेळी केले. “ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले, त्यांना स्वर्गातच जागा आहे,” असेही पाटील म्हणाले.

    सभेत बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “मी खात्रीने सांगतो, ज्यांनी धनुष्यबाण दाबले त्यांना स्वर्गातच जागा आहे. देव त्यांना नरकात जाऊ देत नाही. मात्र, ज्यांनी विरोधकांची बटणे दाबली, त्यांच्यात राम उरलेला नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

    यावेळी त्यांनी विधानसभेतील पराभवावरून माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरही निशाणा साधला. “मी भाकरीत साप पाळला, म्हणूनच मला विधानसभेत पराभवाचा फटका बसला,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे साळुंखेंवर आरोप केले. आपण आजही महायुतीत असून युतीचेच काम करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

    दरम्यान, पाटलांनी भाजपलाही सूचक इशारा दिला. “हा मतदारसंघ २०१४ पासून शिवसेनेचा आहे. तुम्ही आमचा सन्मान ठेवाल, तर आम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. मात्र, तसे झाले नाही तर आम्ही पुन्हा एकट्या वाटेने जाऊ,” असे ते म्हणाले. तसेच “तुम्ही आमचे ऐकले असते तर आज सत्तेत निम्मे भागीदार झाला असता,” असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

    दीपक साळुंखे यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, “ते स्वतःला किंगमेकर म्हणतात. मात्र, ते पांढऱ्या पायांचे असून जिथे जातील तिथे पराभव ठरलेला आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली. शहाजीबापू पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले असून विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी मंत्री खडसे अडचणीत येणार ? सरकारने दिले एसआयटी चौकशीचे आदेश !

    March 11, 2026

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.