Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अनोरे दत्तक गावात श्रमसंस्कार सात दिवसीय शिबिर 2025 चे उद्घाटन उत्साहात !
    राजकारण

    अनोरे दत्तक गावात श्रमसंस्कार सात दिवसीय शिबिर 2025 चे उद्घाटन उत्साहात !

    editor deskBy editor deskDecember 28, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    प.रा .हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक 25 डिसेंबर 2025 ते 31डिसेंबर 2025 या सात दिवसीय शिबिराचे दत्तक गाव अनोरे या ठिकाणी हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले.

    या शिबिरांतर्गत रोज स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावातील विविध कामे रोसयो स्वयंसेवक राबविणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव चे प्राचार्य डॉ. उदय जगताप हे लाभले तर उद्घाटक म्हणून बी जे महाजन विद्यालय अनोरे शाळेचे चेअरमन श्री रमेश खंडू महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनोरे गावचे सरपंच श्री स्वप्निल महाजन , सिनेट सदस्य डॉ.कांचन महाजन, जे बी पाटील, बी जे महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर बी महाले आदींची उपस्थिती होती श्री रमेश खंडू महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या काळातील शिक्षक आणि विद्यार्थी व आजच्या काळातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्यांचा उहापोह केला व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान राखला पाहिजे असे मत व्यक्त केले . डॉ कांचन महाजन यांनी रोसयो चे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.

    तर अध्यक्षीय भाषणात डॉ उदय जगताप यांनी विद्यार्थ्यांना गुरुचा सन्मान राखला पाहिजे शिस्तीचे पालन केले पाहिजे व नवनवीन शिकण्यासाठी नेहमी तयार असावे असे मार्गदर्शन केले या शिबीराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ अरूण कुलकर्णी , उपाध्यक्ष श्री वसंतराव गालापुरे, सचिव डॉ मिलंदजी डहाळे, संचालक श्री अजयशेठजी पगारिया, संचालिका सौ निनाताई पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ श्रीपाद उपासनी यांनी केले तर सूत्रसंचालन एन एस एस महीला कार्यक्रम अधिकारी डॉ ज्योती महाजन यांनी केले. आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ विश्वजित वळवी यांनी केले. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवक व दुर्गेश भय्या यांचे सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी मंत्री खडसे अडचणीत येणार ? सरकारने दिले एसआयटी चौकशीचे आदेश !

    March 11, 2026

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.