पहूर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल
जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला शिवीगाळ, मारहण करून जीवेठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महिला शौचालयात जात असतांना गावातील सचिन सुदाम लोखंडे हा महिलेच्या मागे दुचाकीने येवून मोठ मोठ्याने हार्न वाजवित होता. त्यानंतर महिलेजवळ येवून तिचा हात पकडून विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार महिलेने सचिन लोखंडेच्या घरी सांगितले असता सचिनचे भाऊ जितेंद्र सुदाम लोखंडे, संजय सुदाम लोखंडे आणि त्याची आई सुसाबाई सुदाम लोखंडे यांनी महिलेला शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. महिलेने घडलेल्या प्रकारानंतर पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ना. किरण शिंपी करीत आहे.