जळगाव ;- जळगाव जिल्हा पोलीस दलातील आपल्या सहकारी महिलेला अश्लील मेसेज पाठविणाऱ्या मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबलला सायबर पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे . नरेंद्र वाारुळे असे संशयित अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
एका महिलेच्या नावाने इतरांना अश्लील मॅसेज पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी कारवाईचे आदेश दिले होते. या अनुषंगाने सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत एका महिला तक्रारदाराच्या तक्रारीवरून ४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याविषयी सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे व सहकार्यांनी याची कसून चौकशी केली. सदर गुन्ह्याच्या तपासात मोबाइल क्रमांकाच्या माहितीवरून व प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजच्या विश्लेषणावरून हा गुन्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात काम करणारा पोहेकॉ नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे नरेंद्र वाारुळे हा सायबर विषयातील तज्ज्ञ आहे.