Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार
    क्राईम

    खळबळजनक : लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सावदा स्टेशन प्रबंधकाला अटक; भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    भुसावळ प्रतिनिधी । लग्नाचे आमीष दाखल तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सावदा स्टेशन प्रबंधकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

    भुसावळ पोलीसांच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका भागात २८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ती खासगी नोकरीला आहे. ४ डिसेंबर २०१७ रोजी तिच्या नातेवाईकांच्या लग्नात आली असता तिची ओळख सावदा रेल्वे स्टेशनच्या स्टेशन प्रबंधकपदी नोकरीला असलेला अंकुश किरण मोरे (वय 34 रा. भुसावळ) याच्याशी झाली. त्यावेळी अंकुशने तारुणीकडून मोबाईल नंबर घेऊन संपर्क साधला. मध्यंतरी ३१ मार्च २०१८ रोजी तरुणीला भेटून रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तरुणीने लग्नाची मागणी केली असता त्याने बोलण्यास टाळाटाळ केली.याप्रकरणी तरूणीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंकुश मोरे याला अटक करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.