जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्रात शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता मंत्रीपदासाठी बंडखोर आमदारांना आस लागली आहे. राजकीय क्षेत्रात मंत्रीपदासाठी खलबते सुरू आहे. शिंदे गटातील पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
राज्यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारल्यानंतर राजकीय क्षेत्रात मंत्रीमंडळ निवडीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांचे उत्तर महाराष्ट्रात मंत्रीमंडळात मंत्रीपद निश्चित मानले जात असले तरी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले बंडखोर आमदार किशारे पाटील यांचे नाव आघडीवर आहे.
किशोर पाटलांच्या रूपाने नवीन चेहरा लाभल्यास शिंदे गटाला विस्ताराची मोठी संधी जिल्ह्यात आहे. राजपूत समाजाकडूनही किशोर पाटलांना मंत्रीपद मिळण्याची मागणी केली जात आहे. कालच आषाढीच्या निमित्ताने आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळावे यासाठी समर्थकांनी महाआरती करण्यात आले होती. शिवाय आमदार किशोर पाटील यांच्या मतदार संघात एकनाथ शिंदे पाच वेळा येवून गेल्याने मंत्रीपद निश्चित असल्याचे मानले जात आहे.