Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर दगडफेक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
    क्राईम

    चाळीसगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर दगडफेक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskDecember 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारामुळे आपला पराभव झाल्याच्या रागातून अपक्ष उमेदवार राकेश भीमराव बोरसे यांच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ रोजी दुपारी २.४५ वाजता स्वामी विवेकानंद कॉलनीत घडली असून, या प्रकारामुळे बोरसे कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    प्रभाग क्रमांक ३ मधून एका पक्षाचा उमेदवार पराभूत झाला असून, त्यास अपक्ष उमेदवार कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवराज पाटील, रोहित चौधरी, अजय राजपूत, नीलेश चौधरी यांच्यासह अन्य काही जणांनी बोरसे यांच्या घरासमोर जाऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. “तुम्ही अपक्ष का उभे राहिलात? तुमच्यामुळे नितीन पाटील यांचा पराभव झाला” असे म्हणत आरोपींनी घरावर दगडफेक केली. यात घराच्या काचा फुटून नुकसान झाले.

    इतकेच नव्हे तर आरोपींनी बोरसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ३२४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.