जळगाव : प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील वाघोदा या मूळ गावी कुटुंब देवदर्शनासाठी गेलेले असताना घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख चार हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २० डिसेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिव कॉलनीमधील रहिवासी सुभाष रघुनाथ महाजन (७२) हे कुटुंबासह २० डिसेंबर रोजी सकाळी वाघोदा या मूळ गावी देवदर्शनासाठी गेले होते. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातून रोख चार हजार रुपयांसह सोनेचांदीचे दागिने, वस्तू मिळून एकूण एक लाख ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सुभाष महाजन यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध २१ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.


