जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाक्यावरील ईदगाव मैदानात बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठन करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले.
बकर ईद निमित्त मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टतर्फे अजिंठा चौक येथील इदगाह मैदानावर रविवारी १० वाजता सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास शहरातील मुस्लिम बांधवांनी एकाचवेळी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना उस्मान कासमी यांनी दुवा पठण करत अल्लाहाकडे साकडे घातले. गात सुख शांती नांदू दे अशी दुवा केली असता त्यांच्या प्रत्येक शब्दावर उपस्थित हजारो लोकांनी आमीन म्हणून दुआ कबूल हो असे अनुमोदन दिले.
याप्रसंगी इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, सचिव फारुक शेख, खजिनदार अशपाक बागवान, सहसचिव अनिस शहा व मुकीम शेख, संचालक ताहेर शेख, शरीफ पिंजारी, रेहान शेख, मुस्ताक बादलीवाला, रईस पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव एजाज मलिक, काँग्रेसचे प्रदेश युवा सचिव बाबा देशमुख, काँग्रेसचे जिल्हा सचिव जमील शेख, एमआयएमचे प्रादेशिक सहसचिव रयान जागीरदार, बहिणाबाई विद्यापीठाचे डॉक्टर गयासोद्दीन, ममता हॉस्पिटलचे डॉ. शाहिद खान, डॉ. माजिद खान, ॲड. आमिर शेख, जाहीद शेख, हुसेन बाई मेमन, रफिक पिंजारी, सालार नगर मशिदीचे मौलाना जुबेर विश्वस्त अफसर शेख, अफजल जनाब, पिंजारी बिरादरीचे रोशन पिंजारी, सिकलगर बिरादरीचे अजिज खान, मनियार बिरादरीचे तय्यब शेख, सलीम शेख, अश्फाक शेख, खान बिरादरीचे अताऊल्ला खान, ईदगाहचे माजी सचिव अमीन बादलीवाला यांच्यासह सुमारे चार ते पाच हजार लोकाची उपस्थिती होती.


