Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशिराबाद नगरपालिकेचा निकाल जाहीर; नगराध्यक्षपदी योगेश पाटील !
    राजकारण

    नशिराबाद नगरपालिकेचा निकाल जाहीर; नगराध्यक्षपदी योगेश पाटील !

    editor deskBy editor deskDecember 21, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    नशिराबाद नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, नगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर शिवसेना, अपक्ष तसेच इतर पक्षांनाही प्रतिनिधित्व मिळाले आहे.

    नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे पाटील योगेश नारायण (पिंटू शेठ) यांची निवड झाली आहे. नगरसेवक पदासाठी एकूण २१ सदस्य निवडून आले असून, भाजपचे अनेक उमेदवार विजयी झाल्याने पक्षाचे नगरपालिकेवर वर्चस्व निर्माण झाले आहे.  या निवडणुकीत शिवसेनेनेही दमदार कामगिरी करत अनेक प्रभागांत विजय मिळवला आहे. तसेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि अपक्ष उमेदवारांनीही आपले खाते उघडले आहे. त्यामुळे नशिराबाद नगरपालिकेत विविध पक्षांचे प्रतिनिधित्व पाहायला मिळणार आहे.

    निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. आगामी काळात शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नशिराबाद नगरपालिकेच्या आगामी कारभाराकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.