लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे , तब्बल 40 जणं बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. यात्रेला मुंबई पोलीस हवालदार देखील गेले होते सुदैवाने त्यावेळी अमरनाथ गुहेजवळ नसल्याने संकट टळले होते तोच काळाने घाला घातला श्रीनगरच्या दिशेने परताना सकाळी अचानक त्यांना श्वसनाचा त्रास झिल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई येथील विलेपार्ले पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार सुनील देवजी जंगम 3 जुलै ते 17 जुलैपर्यंत अर्जित रजेवर होते. यादरम्यान ते अमरनाथ यात्रेला गेले होते. 9 जुलै रोजी दर्शन घेऊन श्रीनगरच्या दिशेने परताना श्वसनाचा त्रास होऊ लागला. सहकारीनी स्थानिक मिलिटरी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. सुनील देवजी जंगम यांचे पार्थिव सायंकाळी विमानाने मुंबईत आणणार आहे.वरळी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तसेच त्यांच्या पार्थिवावर आज 9 वाजता कांदेवाडी स्मशानभूमी सुनील देवजी जंगम यांच्या आकस्मित निधनामुळे जंगम परिवारावर शोककळा पसरली आहे.आळंदीतील अजय सोनुने महाराज आळंदी परिसरातील 50 भाविकांना घेऊन अमरनाथला गेले होते. शुक्रवारी दर्शन करून परत येत असताना अचानक ढगफुटी झाली. यात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.