Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आई साखरपुड्याला गेलेली असतांना २५ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !
    क्राईम

    आई साखरपुड्याला गेलेली असतांना २५ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskDecember 19, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आई साखरपुड्याला गेलेली असतांना निलेश मिलींद पाटील (वय २५, रा. ओंकार नगर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याची आई गावाहून घरी परतल्यानंतर त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी एकच आक्रोश केला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि. शहरातील ओंकार नगरात निलेश पाटील हा तरुण आईसह वास्तव्यास होता. दि. १७रोजी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेलेली होती. त्यामुळे निलेश हा घरी एकटाच होता, त्याने घरी कोणीही नसतांना छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी निलेशची आई घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा आतून बंद होता. मात्र निलेश हा दरवाजा ठोठावून आणि आवाज देवूनही आतून प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्यांनी दरवाजाच्या फटीतून डोकावून बघितले असता, त्यांना निलेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

    मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच निलेशच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांच्या घराकडे धाव घेतली यावेळी मृतदेह खाली उतरावून लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.