जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी हे वरदान ठरत आहे अजून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची हवामान खात्याने माहिती दिली.
गेल्या आठवड्याच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरलेल्या पिकांसाठी या पावसाने चांगले जीवदान मिळणार आहे. दुसरीकडे तापी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने हातनुर धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहे. तापी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
अजून पुढील तीन दिवस जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.