Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : महिला घरी एकटी असताना अश्लील चाळे : गुन्हा दाखल !
    क्राईम

    धक्कादायक : महिला घरी एकटी असताना अश्लील चाळे : गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskDecember 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका भागात २८ वर्षीय महिलेचा हात पकडून अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, १७ डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरी एकटी असताना संशयित आरोपी अक्षय मिस्तरी (वय २५, रा. पिंप्राळा) याने तिचा हात पकडून जबरदस्तीने घरात ओढले. त्यानंतर आरोपीने अश्लील चाळे करत महिलेचा विनयभंग केला. या घटनेनंतर धक्क्यात सापडलेल्या महिलेने तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

    तक्रारीच्या आधारे आरोपी अक्षय मिस्तरी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करीत असून, आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.