Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बनावट घटस्फोटाच्या कागदांवर दुसरे लग्न; जळगावात खळबळजनक प्रकार उघड
    क्राईम

    बनावट घटस्फोटाच्या कागदांवर दुसरे लग्न; जळगावात खळबळजनक प्रकार उघड

    editor deskBy editor deskDecember 17, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असतांना घटस्फोटाचे बनावट दस्ताऐवज दाखवित पतीने दुसरे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पहिल्या पत्न ीच्या फिर्यादीवरून पती स्वप्नील अरुण चौधरी, त्याची दुसरी पत्नी राजश्री रोहिदास कोळी उर्फ राजश्री स्वप्नील चौधरी हिच्यासह नऊ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवकॉलनीत राहणाऱ्या वैशाली स्वप्निल चौधरी (वय ३७) यांचा दि. १८ मे २०१३ रोजी धुळे येथील स्वप्नील अरुण चौधरी यांचे लग्न झाले. नंतर न्यायालयात घटस्फोटासंदर्भात दावा दाखल केलेला आहे. या दाव्याच्या कामकाजासाठी वैशाली चौधरी या न्यायालयात आल्या त्या वेळी त्यांची ओळख कविता किरण सपकाळे यांच्याशी झाली. कविता यांनी त्यांची बहीण राजश्री कोळी हिचे स्वप्नील चौधरीसोबत दि. २० मे २०२४ रोजी लग्न झाल्याचे वैशाली यांना सांगितले. पतीचे दुसरे लग्न झाल्याचे समजताच वैशाली यांनी राजश्रीच्या वडिलांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्या वेळी त्यांना समजले की, राजश्रीचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला असून तिला स्वप्नील चौधरीशी लग्न करायचे असल्याचे तिने वडिलांना सांगितले होते.

    विवाहितेचा पहिला पती स्वप्नील, राजश्री व तिच्या कार्यालयात काम करणारे राजेश पाटील यांनी स्वप्नीलचा घटस्फोट झाल्याचे कागदपत्रे दाखविले. त्यामुळे हे लग्न लावून दिले, असे वैशाली यांना सांगण्यात आले. या प्रकरणी वैशाली चौधरी यांनी १५ डिसेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.