लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करून नवीन सरकार उभे केले आहे. यातच शिवसेने कडून एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अनेक टीका आणि शब्दाचा भडीमार होत आहे. यावरच पलाटवार करताना बंडखोर आमदारांमध्ये सहभागी दिपक केसरकर ठाकरेवर निशाणा साधला आहे. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही, केसरकर भडकले दिपक केसरकर यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय वातावरण उफाळून आले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकर हे गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता माध्यमातून सडकून टीका केली. दरम्यान, शिवसेनेच्या आदित्य ठाकरे ,गद्दार हे गद्दारच आहेत. ज्यांना वाटते त्यांनी अजूनही परत यावे असं वक्तव्य केले आहे. अनेक दिवसांपासून ते म्हणाले, यावर केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरे लहान आहात, गद्दार कोणाला म्हणाव ? तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात असे वक्तव्य तुमच्या तोंडातून येताना विचार करा. आम्हीही बरच बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही. माझा वय आदित्य ठाकरेंपेक्षा दुप्पट मात्र, जेव्हा आदित्य ठाकरे येतात त्यावेळी मी उठून उभा राहातो. तो मान त्यांचा नव्हे तर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा आहे.
पुढे ते म्हणाले की, तुमच्याकडे बाळासाहेबांचा वारसा आला म्हणून तुम्हाला सुद्धा तो मान मिळाला आहे. आपण समाजात कसे बोलावे हे संजय राऊतांकडून शिकू नये, उद्धव ठाकरेंकडून शिकून घ्या असा सल्ला केसरकरांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.